Sharad Pawar : मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, संख्याबळ….
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना वेग आला आहे. अशातच यावेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अनेकदा चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.
त्यावर याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली होती, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही असं म्हटलं आहे. Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही, संख्याबळानंतर याचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्त कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो.
अद्याप कशाचा काही ठरलेलं नाही. बहुमत नाही, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात काही शंका नाही, पण आत्ताच काही निर्णय घेण्याची आवश्कता नाही, असंही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.