Sharad Pawar : धनंजय मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवारांनी टाकला सर्वात मोठा डाव, उमेदवार ठरला?


Sharad Pawar : राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर धंनजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ देत ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान आता आगामी विधानसभेला शरद पवारांनी धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी खास रणनीती आखलेली आहे.

त्यासाठी पवारांनी एका नवा दमाच्या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. मराठा आंदोलनाचा असलेला परिणाम पाहता इथे जो उमेदवार पवार रिंगणात उतरवणार आहेत त्यामुळे इथली लढत ही चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.

तसेच परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणाला उतरवायचे याची चाचपणी शरद पवार करत आहेत. परळीच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एन.के. देशमुख यांची छाप होती. त्यांचे पुतणे अभिजीत देशमुख हे सध्या राजकारणात सक्रीय आहेत. Sharad Pawar

दरम्यान, ही बाब हेरून पवारांनी देशमुख यांनाच परळीतून निवडणूक लढवण्यासाठी गळ घातल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अभिजित देशमुख यांनी उमेदवारीबाबत पुण्यात मुलाखतही दिलेली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!