Sharad Pawar : ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज उद्या अटक होणार; शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात उडाली खळबळ…


Sharad Pawar : राज्याचा राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लवकरच राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडल्यावर शरद पवार गटाने प्रचाराला सुरूवात केली आहे.

अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची महासभा झाली. या सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मोठं वक्तव्य केलं आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. अनेक पीकं घेतली जातात. पण त्या पिकाची किंमत शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर तो कर्जबाजारी होतो.

कधी कधी ते कर्ज डोक्यावर एवढे बसते की सावकार घरातील भांडीकुंडी घेऊन जातात. अशीवेळ आल्यावर सन्मानाने जगायची इच्छा ज्याच्या मनात आहे, तो शेतकरी आत्महत्या करतो. हे चित्र फक्त राज्यात नाही, देशात असल्याचं शरद पवार म्हणाले. Sharad Pawar

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा अस्था ही पक्ष फोडणं आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात आहे. झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल चांगले राज्य चालवतात, पंतप्रधानांना आवडत नाही, म्हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक केली. केजरीवाल यांना १६ नोटीस पाठवल्या. आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, हे काय चाललंय? असा सवाल करत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी, एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करतोय हे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची. यात बदल करायचा की नाही, ठरवलं तर आपण करू शकत असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!