आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा! साताऱ्यातून शरद पवार यांनी रणशिंग फुंकले…


सातारा : काल अजित पवार यांनी भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपण लढणार असल्याचे सांगितले आहे. आज ते सातारा दौऱ्यावर होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे, असे म्हणत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे. जनता भाजपला जागा दाखवून देईल. चुकीच्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत.

भाजपाच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले आहेत. देशात, राज्यात संर्घष पेटवण्याचा हा प्रयत्न आहे. एकोप्याने राहणा-या समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून विरोधकांची सरकार पाडली जात आहेत. लोकशाहीच्या अधिकाराचे जतन महत्त्वाचे आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत काल शपथविधी सोहळ्याला जे राष्ट्रवादीचे आमदार हजर होते त्यातील काही आमदार यावेळी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत आल्याचे पहायला मिळाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!