Sharad Pawar Birthday : नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंतप्रधान म्हणाले…
Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. त्यामुळे, त्यांचा वाढदिवस देशपातळीवर विविध ठिकाणी साजरा केला जातो.
देशभरातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. Sharad Pawar Birthday
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात एक गट भाजपासोबत गेला आहे. तर, दुसरा गट शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने मोदी सरकावर टीका केली जाते. मात्र, राजकीय मतभेद बाजुला ठेऊन मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेतून ते केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे. नागपुरात फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून गृहमंत्र्यांना लक्ष करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज त्यांचा वाढदिवस असल्याने राजकीय मतभेद विसरुन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.