Sharad Pawar : सत्ता कशी हातात येत नाही तेच बघतो!! शरद पवारांचे मोठे वक्तव्य, पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar : शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे.
आज दोन्ही सरकारे आमच्या हातात नाहीत. पण कालच्या निवडणुकीत जसे काम झाले तसे काम केले. तर राज्य सरकार कसे आपल्या हातात येत नाही, तेच मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं. विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी केले आहे.
शरद पवार तीन दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. येथील ग्रामीण भागांत जाऊन दुष्काळग्रस्त नागरिकांच्या व्यथा ते समजावून घेत आहेत. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर येथील नागरिकांच्या दुष्काळी प्रश्नांसंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिले आहे. बुधवारी त्यांची बारामतीच्या नीरावागजमध्ये छोटेखानी जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी बारामतीच्या ग्रामीण भागांतील जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, काही लोकं तात्पुरते यशस्वी होतात. मी नेहमी सांगतो, देशात लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते कोणास ठाऊक? ज्यांना मोठे केले ते आसपास दिसत नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली.
तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होते काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्यात हात पण नाही घालता येतं. हे पाणी कसं नीट करता येईल, असंही शरद पवार म्हणाले आहे.