Sharad Pawar : अजित पवारांना मोठा धक्का! इंदापूरमध्ये शरद पवारांनी टाकला डाव, बडे नेते देणार शरद पवारांची साथ…


Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याठिकाणी पवार कुटूंबात फूट पडल्यानंतर आता लोकसभेला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. यामुळे नेते मंडळी अनेकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशातच आता मार्केट कमिटीचे आप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटात जाणार आहेत. तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याचे दोन उपाध्यक्ष भरत शहा आणि कांतीलाल झगडे शरद पवारांच्या गोटात जाणार आहेत. यामुळे सुनेत्रा पवार यांना याचा फटका बसणार आहे.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व असणारे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे शरद पवारांना साथ देणार असल्याचे समजते. भरत शहा यांचे इंदापूर शहारत वर्चस्व आहे, ते कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.

यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्या याबाबत माहिती सविस्तर पुढे येईल.

कर्मयोगी व नीरा भीमा हे दोन सहकारी साखर कारखाने भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत. दोन्ही कारखान्याचे उपाध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मंगळवारी इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!