Sharad Pawar : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शरद पवारांना मोठा दिलासा, ते चिन्ह केलं बंद…
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीआधी १० जागा लढवून ८ जागांवर यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. लोकसभेला तुतारी चिन्हावरुन झालेला गोंधळ पुढील निवडणुकांमध्ये टाळण्यासाठी शरद पवार गटानं केलेली विनंती निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलेल्या तुतारी चिन्हाला विरोधकांनी पिपाणी दाखवून चांगलेच आव्हान दिले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत तुतारीचा प्रभाव कमी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता विरोधकांची ‘पिपाणी’वाजणे ‘बंद’ झाले आहे. Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यात आल्यानंतर शरद पवार गटाला नवं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आलं. त्यांना तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह दिलं गेलं. पण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट लढवत असलेल्या अनेक जागांवर अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट चिन्ह देण्यात आलं. त्याचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला.
एखाद्या उमेदवाराला ट्रम्पेट चिन्ह देण्यात आल्यास त्याचा उल्लेख ट्रम्पेट असाच करण्यात यावा. त्याचा उल्लेख तुतारी असा होऊ नये, अशी मागणी शरद पवार गटानं निवडणूक आयोगानं केली होती. ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला बूस्टर मिळाला आहे.