शरद पवारांनी पत्रकाराला झापले, थेट लायकीच काढली, नेमकं काय झालं, जाणून घ्या..

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षी शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे. कराडमध्ये प्रितीसंगमावर जाऊन आल्यानंतर पवार हे साताऱ्याला पोचले. तेथे मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी खडसावले.
अजित पवारांनी उचललेल्या या पावलांना बंड म्हणायचे की तुमचा आशिर्वाद? असा अनपेक्षित प्रश्न एका पत्रकाराने विचारला आणि शरद पवार भडकले.
ते म्हणाले, मी जाहीरपणे पक्षाच्या बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो असताना तुमच्यासारखाच एखादा क्षुद्र बुध्दीचा व्यक्ती पत्रकार परिषदेमध्ये आशिर्वाद हा शब्द वापरू शकतो. तुम्ही पत्रकारीतेचा दर्जा खराब करू नका. अशा शब्दात पवारांनी पत्रकाराला खडसावले.
दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार असून दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात घेणार असल्याची माहिती आहे.
या दौऱ्याची सुरुवात शिवनेरीपासून करणार असून शेवट रायगडवर करणार करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्याला नेतृत्व दिले, त्यांचे नाव आहे जयंत पाटील आहे, ते विधिमंडळात नेते सुद्धा आहे. नेत्याने एखाद्यावेळी निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे.
त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. तुमच्याकडून मला कळले आहे. तो निर्णय जर त्यांनी घेतला असेल तर काही विचार करूनच घेतला असेल.