Sharad Pawar : शरद पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही निष्ठावंत राहणार, हडपसर येथील शमशुद्दीन इनामदार यांचे वक्तव्य…

Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील पक्षांमधली बंडाळीही समोर येताना दिसते आहे. काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होताना दिसत आहे.
तच आता हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. त्यामध्ये अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच ते विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आनंद अलकुंटे माजी नगरसेवक आहेत. सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पीएमपीएल चे माजी संचालक म्हणून ही काम केले आहे.
हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.
त्याबाबतची वृत्ते माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आता शमशुद्दीन इनामदार यांनी याबाबत खुलासा केला आहे. शमशुद्दीन इनामदार म्हणाले, सुरुवातीपासून आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असून लोकसभेच्या निवडणुकीत देखील डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात आमचा मोठा वाटा होता. Sharad Pawar
यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही निष्ठावंत राहू. तसेच यापुढे देखील हडपसर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता संपूर्ण ताकद लावू , असे इनामदार म्हणाले आहे.