Sharad Pawar : माझा बाबा सिद्दिकी करण्याचा डाव!! पवार गटाच्या बड्या नेत्याच्या आरोपाने उडाली राजकारणात खळबळ…


Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन्ही भाऊ आरोपी आहेत. १२ ऑक्टोबर रोजी जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ तीन बंदुकधाऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांनी मोठा देवा केला आहे. माझी देखील बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे हत्या करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.

या प्रकरणी रमेश कदम यांनी पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरु असल्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली. Sharad Pawar

रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!