Sharad Pawar : लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवारांचा अजितदादांना टोला, म्हणाले कुठल्या का होईना बहिणींना…

Sharad Pawar : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. यावर आता शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
घरातील लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेरच्या बहिणींना निधी द्यायचा, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धोरणाचा आगामी निवडणुकीत फायदा होईल का? असा सवाल पत्रकारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय. ‘ कुठल्या का होईना बहिणींना द्या, असे शरद पवारांनी म्हटलं आहे. Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल. आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी यामुळे फटका बसला. सातारा लोकसभा मतदारसंघात देखील आम्हाला फटका बसला आहे.
आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिला. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे. स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.