Sharad Pawar : मोठी बातमी! पक्ष फुटीनंतर कुटूंबही फुटल? यंदा बारामतीत शरद पवार गोविंदबागेत तर अजित पवार काटेवाडीत करणार पाडवा साजरा…

Sharad Pawar : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. अजित पवार तीन दिवस बारामतीमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाही दिवाळीचे चार दिवस मुक्काम बारामतीतच आहे. Sharad Pawar

अशातच आता अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये राजकीय फूट पडल्यानंतर यंदाच्या दिवाळीत पाडव्यानिमित्त अजित पवार काटेवाडीतील निवासस्थानी तर शरद पवार गोविंदबागेतील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
नेहमीप्रमाणे गोविंद बागेमध्ये पवारांचा पाडवा होत असतो. त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटत असतात आणि या पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र येत असत. बारामती येथील गोविंदबागेत गेल्या पन्नास वर्षापासून दिवाळी पाडवा साजरा होत आहे.
अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर यंदाच्या पवार कुटुंबाच्या पाडव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता अजित पवार गोविंदबागेत होणाऱ्या पाडव्याला उपस्थित न राहता काटेवाडीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. त्या ठिकाणी ते राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. स्वतः अजित पवारांनी या संदर्भातील माहिती दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार १, २, व ३ नोव्हेंबर असे दिवाळीचे तीन दिवस पूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनीच जाहीर सभेदरम्यान दिली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील ५ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, सुपे, मोरगाव व सोमेश्वर येथे सभा घेणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी व्यापारी, वकील व डॉक्टरांशीही ते संवाद साधणार आहेत.
