Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच पाडवा, कार्यकर्त्यांची रीघ, अन् अजितदादा…


Sharad Pawar : शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामतीमधील गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा साजरा होत आहे. राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत.

गोविंद बागेबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली असून, शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर यंदाच्या गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान गोविंद बागेबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . Sharad Pawar

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबिय एकत्र आले आहे. यावेळेस निमित्त दिवाळीचं होतं. दिवाळी सणानिमित्त पवार कुटुंबिय एकत्र आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे. या सर्व भेटीचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्याच आठवड्यात भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. शरद पवार यांचे बंधु प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घडून आली होती.

या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे. कन्हेरी येथील अनंत तारा बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!