Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत परिवारातील अजून एक व्यक्ती उतरला मैदानात, राजकारणात एन्ट्री करणारा व्यक्ती कोण?


Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवसेनेप्रमाणे फूट पडली आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक जणांनी शरद पवार यांची साथ सोडली. पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांचे विश्वास दिलीप वळसे पाटीलसुद्धा अजित पवार यांच्याबरोबर गेले. यावेळी शरद पवार यांची साथ परिवारातील रोहित पवार याने दिली.

शरद पवार विस्कळीत झालेली घडी बसवत असताना एकीकडे सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे रोहित पवार विरोधकांना घेरु लागले. रोहित पवार यांनी राज्यात युवा संघर्ष यात्रा काढली. आता शरद पवार यांच्यासोबत परिवारातील आणखी एक जण राजकारणात येण्याची तयारी करत आहे.

शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करण्याच्या चर्चा सुरु झाली आहे. Sharad Pawar

श्रीनिवास पवार उद्योजक आहेत. त्यांचा शरयू ग्रुप आहे. हा ग्रुप कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे. श्रीनिवास पवार राजकारणापासून बाहेर राहतात. शरद पवार त्यांचे काका आहेत.

परंतु आता त्याचा मुलगा युगेंद्र राजकारणात येत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसोबत दिसून आले. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे युगेंद्र पवार आयोजक आहेत. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करण्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!