Sharad Pawar : दौंड तालुक्यात शरद पवार यांच्या पहिल्याच सभेला प्रचंड गर्दी! नामदेव ताकवणेंचा शरदचंद्रजी पवार पक्षात जाहीर प्रवेश..!!


Sharad Pawar यवत : दौंड तालुक्याचे माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे व माझे घनिष्ठ संबंध होते. विधानसभेमध्ये आम्ही सहकारी होतो. येणाऱ्या काळात नामदेव ताकवणे यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशासाठी यवत येथे आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, आज देशात कठीण परिस्थिती आहे. पेट्रोल व गॅसचे भाव वाढलेले आहेत. साखर निर्यात कांदा निर्यात भाजप सरकारने बंद केलेली आहे. शेतीमालाला भाव नाही.

भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने वाटचाल करत आहे,एका राज्यात मुख्यमंत्र्याला या देशात अटक होत आहे. खासदार व आमदारांनाही या देशात अटक होत आहे. हे जे काही चाललं आहे ते योग्य नाही. पोलीस, ईडी, सीबीआय या यंत्रणेंचा गैरवापर भाजप सरकार करत आहे. Sharad Pawar

दौंड तालुक्यातील एकाला मी वारंवार १० ते १५ एकर जागा मागत होतो शिक्षण संस्थेसाठी. पण त्यांना ती देता आली नाही. मी शिक्षण संस्थेवर जास्त लक्ष देतो. रयत शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. या संस्थेच्या तीनशे संस्था आज चालू आहेत.

बारामतीचा आपला खासदार हा अतिशय हुशार आहे. संसदरत्न आहे, परदेशात नावलौकिक केलेला आहे, सर्वगुणसंपन्न आपला खासदार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपल्या खासदारालाच आपण मतदान करायचं आहे, व भरघोस मतांनी निवडून द्यायचा आहे असे
पवार सभेत सांगितले.

याप्रसंगी आमदार रोहित पवार, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, सचिन काळभोर, अजित शितोळे, धीरज भळगट तसेच काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी,आप आदी पक्षाचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरदचंद्र पवार यांच्या सभेला मिळालेल्या नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे दौंड तालुक्यातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण झालेले दिसुन आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!