Sharad Pawar : शरद पवार यांचा बडा उमेदवार अडचणीत, धक्कादायक माहिती आली समोर…

Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान सांगली जिल्ह्यात तासगावमध्ये फराळाच्या पाकिटातून पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, या प्रकरणात भरारी पथकाने तात्काळ कारवाई केली आहे. तासगावमध्ये रोहित पाटलांच्या दोन कार्यकर्त्यांवर – सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम – गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. Sharad Pawar
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याने तासगावमधील साठेनगर येथील मतदारांना दिवाळीच्या फराळासोबत ३००० रुपयांचे पाकीट देत असल्याचे उघड झाले.
याबाबत भरारी पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि कार्यकर्त्याकडे पांढऱ्या रंगाच्या १६ पाकिटांमध्ये १ लाख ८ हजार ५०० रुपयांची रक्कम आढळून आली. या रकमेच्या पाकिटांमध्ये प्रत्येकात ३००० रुपये, ५०० रुपयांच्या १११ नोटा आणि ५००० रुपये रोख आढळले.