Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार यांना मोठा धक्का, जवळचा नेता आता भाजपमध्ये जाणार….


Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार सुरेश लाड हे भाजपमध्ये जाणार आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश लाड उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे एकेकाळी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. Sharad Pawar

मात्र, अलिकडे त्यांच्यातील हा स्नेह कमी झाला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. शरद पवार गटाकडून लाड यांना फारसं बळ मिळत नसल्याने सुरेश लाड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

याशिवाय लाड यांच्यासोबत अनेक नगरसेवक, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे काही सदस्यदेखील पक्षप्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!