Sharad Pawar : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची मोठं वक्तव्य, म्हणाले, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय…
Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याच आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहे.
तसेच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते.
या बैठकीत मनोज जरांगे पाटील, रश्मी शुक्ला यांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगांनेही चर्चा झाली. यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यावरुन भाष्य केले आहे. Sharad Pawar
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती.
या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली.
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे, त्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात. सत्तेच्या गैरवापराबद्दल, त्यांना एक्स्टेंशन देऊन त्यांच्या कालखंडात निर्णय घेण्याचा प्रयत्न होता. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये, असे शरद पवार म्हणाले आहे.