Sharad Pawar : निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी सध्या जागा वाटपबाबत फॉर्म्युला ठरवत आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
अशात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नेत्यांची इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे. महायुतीमधील बऱ्याच नेत्यांनी पुन्हा आपल्या पक्षात घरवापसी केली आहे. तर, काही ठिकाणी उमेदवारी न मिळण्याचे संकेत मिळताच नेते मंडळी मविआच्या वाटेवर जात आहेत. आता जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. Sharad Pawar

जळगावमधील बड्या नेत्याने शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता जळगावातही पक्षांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेपूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे नेते, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे.