Sharad Mohol : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले..


Sharad Mohol : कोयता गँगचा हैदोस सुरु असतानाच पुण्यनगरी पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने हादरले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची लग्नाच्या वाढदिनीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुण्यामध्ये मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. या भागातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाने अनेक गुंडांना आश्रय दिल्याची टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी केली आहे.

आमदार धंगेकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. Sharad Mohol

कोथरूड भागामध्ये साहित्यिक कलावंत वास्तव्यास आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्था देखील कोथरूड परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी शिक्षणासाठी अनेक वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहेत.

कोथरूड सह पुणे शहरांमधील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची सध्या गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत असं धंगेकर म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!