Sharad Mohol : शरद मोहोळ याचा खून हा मामाचा वाद नाही? खरे कारण येणार लवकरच समोर, पोलीस तपासात भयंकर माहिती समोर..
Sharad Mohol : तलवार गँगचा हैदोस सुरु असतानाच पुण्यनगरी पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने हादरले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची लग्नाच्या वाढदिनीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
शरद मोहोळ याचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला. वीस वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार आहेत. हा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीचा वादातून झाल्याचे आरोपींनी म्हटले आहे.
परंतु त्यांचा हा दावा पटणारा नाही. यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी कसून चौकशी सुरु केली आहे. शरद मोहोळ याचा खुनामागे बडी धेंडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. एकमेकांसमोर बसवून आरोपींची चौकशी केली जात आहे. Sharad Mohol
शरद मोहोळ खून प्रकरण साधे अन् सोपे नाही. यामागे नियोजनबद्ध कट आहे. गुन्हेगारी विश्वातील आरोपी किंवा इतर कोणी यामागे आहे का? याचाही तपास केला जात आहे. यामुळे पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावले होते.
पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलवले आहे. हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळ यांच्यात वादही झाला होता.