Sharad Mohol : मोठी बातमी! शरद मोहोळ हत्या प्रकरणी अखेर मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक..

Sharad Mohol पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणे हादरले होतं. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे समोर आले आहे.
कारण हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड रामदास मारणे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अखेर या आरोपीला पकडलं असून आता रामदास उर्फ वाघ्या मारणे याने मोहोळला का संपवलं? पोलीस याबाबत काय माहिती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे सह त्याच्या साथीदारांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यामधील तीन जण हे आरोपी आहेत तर तीन जण संशयापद असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. Sharad Mohol
पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपीला पकडलं होतं मात्र येते मागचा खरा मास्टरमाइंड वेगळा कोणतरी असल्याचा संशय पोलिसांना होता. अखेर पोलिसांनी या आरोपीला पकडलं असून त्याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, रामदास मारणे नेमका कोण? याचा मारणे टोळीशी काही संबंध आहे का? त्याचबरोबर शरद मोहोळ याची हत्या का केली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता याप्रकणी काय नवीन खुलासे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.