Sharad Mohol murder case : वकिलांनी सिमकार्ड बदलले, मारेकऱ्यांसोबत दीड तास फिरले, शरद मोहोळ हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर…

Sharad Mohol murder case : पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे. हा तपास अधिक वेगाने करण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात येणार आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाच्या सखोल तपास करण्यात येणार आहे.

यावेळी पुणे पोलिसांनी या हत्या प्रकरणाची महत्त्वाची माहिती दिली आहे. या खून प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील दीड तास आरोपींबरोबर असल्याची माहिती समोर आली आहे.आरोपींना दोन्ही वकील खेड शिवापुर टोल नाक्यावर जाऊन भेटले.
वकिलांचा आरोपी सरेंडर येण्याचा दावा देखील पोलिसांनी न्यायालयात फोडला. आरोपींना पोलिसांनाकडेसरेंडर व्हायचे होते मग त्यांनी सिम कार्ड का बदलले? असा प्रश्न देखील उपस्थित केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही वकिलांना ११ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Sharad Mohol murder case

दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांना शरण यायचे होते, असा दावा ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांनी केला होता. त्यावर पोलिसांनी आरोपींना शरण येयाचे होते तर त्यांनी सिम कार्ड का बदलेले ? पुण्याच्या दिशेने न येता विरुद्ध दिशेने का प्रवास केला ? दोन्ही वकील आरोपींना कुठे घेऊन जाणार होते? असे उपस्थित केले.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वकिलांच्या पोलिस कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढवली.