Sharad Mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला थरारक पाठलाग करत अखेर अटक…
Sharad Mohol murder case पुणे : गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत संगमनेर येथून त्याला अटक केली आहे. पोलिसांना बघून पळ काढणाऱ्या मारणेला पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले आहे.
गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांकडून शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर मोक्का लावला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. Sharad Mohol murder case
शरद मोहोळ हत्या प्रकरणात २० हून अधिकजणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर १५ जानेवारी रोजी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती.
दरम्यान, याआधी गणेश मारणेने अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे कोर्टाने म्हटलं होतं. त्यानंतर तो फरार होता.