Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन नामवंत वकील कसे अडकले? रडत रडत कोर्टात दिली माहिती, म्हणाले..


Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणं हादरलं होतं. प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून दररोज नवीन माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील २ जण वकील आहेत. या वकीलांना न्यायालयात आपली बाजू मांडताना अश्रू अनावर झालेत. मोहोळ खून प्रकरणात ७ तरुणांसह २ वकिलांना पोलिसांनी अटक केलीये.

शरद मोहोळ खून प्रकरणामधील आरोपींना काल न्यायालयात हजर केले होते. यावेळी आरोपी दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी वकिलांची नावे आहेत.

वकिलांनी आपली बाजू मांडताना न्यायालयामध्ये सांगितले की, ज्यावेळी आरोपींनी शरद मोहोळ याची हत्या केली त्यावेळी त्यांना सिरेंडर करायचे होते. आम्ही देखील त्यांना तोच सल्ला दिला आणि त्याची माहिती पोलिसांना फोन द्वारे कळवली. Sharad Mohol

त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना देखील आम्ही तेच सांगितले. मात्र पोलिसांनी आमचे ऐकले नाही. आम्ही जवळपास पंधरा वर्षे झालं वकिली व्यवसाय करत आहोत आम्ही काहीही केले नाही, असे सांगत वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!