Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर, पहा व्हिडिओ…
Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणं हादरलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे.
शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळने त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Sharad Mohol
कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा परिसरातील आपल्या घरातून बाहेर निघाला होता. त्याच्या साथीदारांसोबत तो रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. मात्र अचानक रस्त्यातच त्याच्यावर त्याच्यासोबत चालणाऱ्या साथीदारांनी हल्ला चढवला.
पुणे : धाड..धाड..धाड; निमुळत्या गल्लीतच 'गेम' वाजवला, शरद मोहोळच्या हत्येचे थरारक सीसीटीव्ही फूटेज pic.twitter.com/CiwtxvtMf2
— Prashant Patil (@Prashant_P95) January 6, 2024
तीन जणांना आपल्याजवळील पिस्तुलातून शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. काही क्षणात शरद मोहोळ जमिनीवर कोसळला. त्यानंतर हल्लोखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. Sharad Mohol
दरम्यान ,आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहाळची हत्या करण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरसह ८ जणांना अटक केली आहे.