न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय विमा परिषदेच्या सदस्यपदी पुणे जिल्ह्यातून शामल पंडित यांचे एकमेव निवड…

पुणे : स्टार हेल्थ कंपनीच्या न्युझीलँड या देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पुणे जिल्ह्यातून जिल्ह्यात नंबर वन असलेल्या स्टार हेल्थ विमा प्रतिनिधी सौ शामल संतोष पंडित यांची एकमेव निवड झाली असून त्या दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी न्यूझीलंड या ठिकाणी होणाऱ्या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत .

त्यांनी मागील वर्षे पुणे जिल्ह्यातून कंपनीसाठी सर्वात मोठा व्यवसाय दिला असून त्यांनी त्यांच्याकडे पॉलिसी घेतलेल्या कस्टमर यांना शंभर टक्के क्लेम मंजूर करून दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून शंभर टक्के क्लेम मंजूर करून देणाऱ्या व सर्वात जास्त विमा पॉलिसी कस्टमर असल्याने त्यांचा पुणे जिल्ह्यात नंबर वन आहे.
शामल पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मेडिक्लेम पॉलिसी काळाची गरज आहे . सध्या हॉस्पिटलचा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडत नाही त्यामुळे सर्वांनी पॉलिसी काढून आपलं कुटुंब सुरक्षित केले पाहिजे हे आजचे गरज आहे.

पॉलिसी असल्याने आपल्याला पाहिजेल त्या हॉस्पिटलला चांगल्या प्रकारे उपचार मिळतात व आपले कष्टाचे पैसे वाचतात असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्या म्हणाल्या आम्ही नुसती पॉलिसी देत नाही तर ,क्लेम आल्यानंतर तो शंभर टक्के मंजूर करून देण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो .त्यांनी मागील वर्षी शंभर टक्के मंजूर केले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातून न्युझीलंड या देशात जाणाऱ्या पहिल्या महिला स्टार हेल्थ विमा प्रतिनिधी आहेत.