महाभारतातील शकुनी मामा काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं ७८ व्या वर्षी आज निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रुग्णालयात दाखल होता.
गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! शशिकांत शिंदे यांच्या घरात फूट, जेष्ठ बंधू शिवसेनेत..
सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी गुफी पेंटल यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गुफी हे फरिदाबादमध्ये असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तेथे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले होते . अखेर आज अंधेरी येथील रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हडपसर सासवड रोडवर मोठा अपघात, चारचाकी गाडीने महिला सफाई कामगाराला चिरडले
गुफी यांनी सन १९७५ मध्ये रफू चक्कर या हिंदी सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सन १९८८ मध्ये त्यांना बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतून खरी ओळख मिळाली होती.
पुण्यात खळबळ! सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फिरताना भरदिवसा जावयाची हत्या
गुफी पेंटल यांनी ‘सुहाग’, ‘दिल्लगी’, ‘देस परदेस’ आणि ‘दावा’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. गुफी पेंटल यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गुफी पेंटल आजारी असल्यापासून त्यांचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. आज त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.