छत्रपती शाहू साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट; व्यवस्थापनात ठरला सर्वोत्कृष्ट..

पुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू साखर कारखान्याने सहकारात नवा शिरपेच रोवला आहे. राज्यातील उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची निवड झाली आहे.

राज्याच्या साखर उद्योगात भरीव कामगिरी केल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या ११ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेत इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


तसेच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली आहे.
दरम्यान, विविध पुरस्कारांमध्ये ऊस भूषण, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, आसवनी पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, आदी पुरस्कारांचा समावेश आहे. विलासरावजी देशमुख उद्योजकता पुरस्कार नगर जिल्ह्यातील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे.
