Shahrukh Khan : शाहरुख खानच्या जीवाला धोका, सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

Shahrukh Khan मुंबई : शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. अजूनही हा चित्रपट सातत्याने कमाई करत आहे. जवानने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत. शाहरुख खान बाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. Shahrukh Khan

शाहरुख खान याला सतत धमक्या येत असल्यामुळे सरकारने मोठे पाऊल उचले आहे. सतत येत असणाऱ्या धमक्या लक्षात घेत अभिनेत्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. Shahrukh Khan
राज्य सरकारकडून किंग खान Shahrukh Khan याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यामुळे शाहरुख खान याला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून तैनात असलेले ६ पोलीस कमांडो शाहरुख खान याच्या सुरक्षेसाठी कायम असतील.

किंग खान याला भारतभर सुरक्षा पुरवली जाईल. एवढेच नाही तर, MP-5 मशीन गन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने अभिनेत्याची सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच अभिनेत्याच्या राहत्या घरी देखील चार पोलीस तैनात असतील. अशी देखील माहिती मिळत आहे.
शाहरुख खानच्या सुरक्षेशिवाय इतर सुरक्षेसाठी त्याच्या घरावर मुंबईचे चार पोलीस २४ तास पहारा ठेवतील. शाहरुख खान मन्नतजवळून जाणाऱ्या लोकांवरही ते लक्ष ठेवणार आहेत.
दरम्यान, शाहरुख खानला ही सुरक्षा फुकट मिळणार नाही. शिवाय जोपर्यंत समिती या धमकीचा पुन्हा आढावा घेत नाही तोपर्यंत ती किंग खानकडेच राहील. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून मोठा वाद झाला होता.