महाराष्ट्र सरकारकडून शाहरुख खानला मिळणार ९ कोटी रुपये? महत्वाची माहिती आली समोर…


मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून ९ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्याशी निगडीत आहे.

तसेच ९ कोटी रुपये परत करण्यासंदर्भात शाहरूखची पत्नी गौरी खान याने याचिका दाखल केली होती. तीच याचिका महाराष्ट्र सरकार मंजूर करू शकते . शाहरुख खानचं घर मन्नत उभारलं आहे, त्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या नावावर, बांद्रा पश्चिम येथील बँडस्टँडमध्ये नोंदणीकृत असलेला हा बंगला मूळतः राज्य सरकारने पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीवर बांधला आहे. नंतर सरकारने या कराराला मंजुरी दिली, त्यानंतर मालकाने शाहरुख खानला मालमत्ता विकली.

यानंतर या शाहरुख आणि गौरीने ‘मन्नत’ असलेल्या जागेसाठी दिलेले अतिरिक्त पैसे परत करण्याची मागणी केली. शाहरुख खान आणि गौरी खानचे हे घर २४४६ स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेलं आहे. शाहरुख आणि गौरीच्या नावावर घर रजिस्टर्ड आहे.

आता शाहरुख आणि त्याच्या पत्नीने राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या अंतर्गत ते त्या भाडेतत्त्वावरील जमिनीवर आधीच्या मालकाकडून मालकी हक्क मिळू शकतो.

दरम्यान, गौरी आणि शाहरुखने मार्च २०१९ मध्ये रेडी रेकनर किमतीच्या २५ टक्के रक्कम भरली होती, जी २७.५० कोटी रुपये होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख-गौरी यांना नंतर कळलं की, राज्य सरकारने कन्वर्जन फी मोजताना अनवधानाने चूक केली होती. कन्वर्जन फी मोजताना जमिनीच्या तुकड्यापेक्षा बंगल्याची किंमत गृहीत धरण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!