मुंबईतील शाह दामपत्त्यांचा मृत्यू गिझर मुळे नाहीच तर ; होळीदिवशी भांग पिल्याने विषबाधा?
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण आले असून दाम्पत्याचा मृत्यू गीझरमुळे नसून भांग पिल्याने झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला असून पुढील तपास पंतनगर पोलिस करत आहेत.
दरम्यान, धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मित्रांसोबत रंग खेळून आलेले टीना शाह आणि दीपक शाह राहत्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले होते. दुपारी साडेतीन वाजता शाह दाम्पत्य घरापासून दोनशे मीटर अंतरावर छेडानगर जंक्शनवर दिसले होते. मात्र त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांच्या ठावठिकाण्याविषयी स्पष्टता नाही.
त्यानंतर काल (शुक्रवारी) पोलिस आणि डॉक्टरांनी हे भांग, अल्कोहलसारख्या विषबाधेचे कारण असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे. या जोडप्याचे महत्त्वाचे अवयव तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. पोटातील रासायनिक पदार्थ, घटनास्थळी सापडलेल्या उलटीच्या खुणा आणि इमारतीच्या कॅमे-यातील फुटेज याचा तपास सुरू आहे. यामधून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे