जबरी चोरी व इतर गुन्ह्यातील फरार आरोपींना बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई..
उरुळी कांचन : जबरी चोरी व इतर गुन्हयातील फरार असलेल्या आरोपींना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
उर्फ विक्या उर्फ हुक्या वय ३० वर्षे, रा. वरकुटे खुर्द कुंभार टेक निमगाव केतकीच्या जवळ ता. इंदापूर, जि. पुणे) विकेण उर्फ विक्या उर्फ हुक्या शिवा काळे, (वय ३० वर्षे, रा. वरकुटे खुर्द कुंभार टेक निमगाव केतकीच्या जवळ ता. इंदापूर, जि. पुणे) सचिन आनंता उर्फ आत्या भोसले, (रा. धुमाळ वस्ती आलेगाव, ता. दौंड) फैजान समीम अहमद (वय २३ वर्षे, रा. शिंदेवाडी, ता. भोर, जि. पुणे) हितेश सुरेश मानकर, (वय २३ वर्षे, रा. सांगरून ता. हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आरोपींची नावे त्यांच्यावर वेगवेळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी फरार आरोपींना पकडण्याचे आदेश साथींक गुन्हे शाखेला दिली होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले.
गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना पडकण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या त्यांची चोकशी केली असती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली अनमोल मित्तल, परी सहायक पोलीस अधीक्षक प्रभारी अधिकारी हवेली पोलीस स्टेशन, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर, पोसई प्रदिप चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, सहा फौज बाळासाहेब कारंडे, सहा फौज रविराज कोकरे, पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे, पोलीस हवालदार स्वप्निल आहीवळे, पोलीस हवालदार राजु मोमीन, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे पोलीस हवालदार आसिफ शेख, अजित भुजबळ, अमोल शेडगे, बाळसाहेब खडके, मंगेश भगत यांनी केली आहे.