अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल अन्… महिला पोलिसाच्या मदतीने भरती प्रशिक्षण केंद्रातच मुलींचे लैंगिक शोषण..
नालासोपारा : नालासोपारा येथे पोलिसांकडून मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यातकार्यरत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार, पोलीस समाधान गावडे (वय. २८) आणि त्याच्या २५ वर्षीय मैत्रिणीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.
मिळालेल्या माहिती नुसार , समाधान गावडे आणि त्याच्या २५ वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गावडे हा नालासोपारा येते विजयी भव नावाची पोलीस अकादमी चालवतो. शिकविण्याच्या नावाखाली आरोपी मुलींच्या शरिराला हेतुपूरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता.
अनेकवेळा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जाऊन त्यांना फिरायला बोलवत होता. त्याच्या मैत्रिणीने यामध्ये त्याला मदत केल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉटसप स्कॅन करुन आरोपी गावडे बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. या प्रकारामुळे संबंधित मुलीने क्लासला जाणे बंद केले होते.
पीडित मुलींनी मानसिक त्रास झाल्याने त्यांनी हा प्रकार घरच्यांना सांगितला. बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांवर विनयभंग लकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पीडित मुलींच्या जाबाबनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.