पतीसमोरच पत्नीवर बलात्कार; उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराचं कृत्य; हडपसर परिसरातील धक्कादायक घटना..

पुणे : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने पतीच्या समोर तिच्या बायकोवर बलात्कार केला आहे. त्यानंतर आरोपीने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला.

ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
याप्रकरणी एका ३४ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, इम्तियाज हसीन शेख (वय. ४७) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीला इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही.
त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही त्याने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून पुन्हा एकदा महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला.
यानंतर आरोपीने हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन टाकले. या घटनेची माहिती मिळताच पीडितेने तात्काळ हडपसर पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.