देशात आज तीव्र उष्णतेची लहर तर काही ठिकाणी वादळी पाऊस, गारपीट; अचानक वातावरणात बदल..
पुणे : सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. असे असले तरी दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असे समीकरण झाले आहे. देशात काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लहर तर काही ठिकाणी वादळी पाऊस, गारपीट असेव परस्परविरोधी हवामान दिसून येत आहे.
पुण्यात सराईत गुन्हेगारावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण..
कालपासून पूर्व बिहारमधील काही भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील उष्णतेची लाट होती. यामुळे याचा अनेकांना त्रास झाला. पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त म्हणजेच 5.1°C किंवा अधिक होते.
तसेच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे बहुतेक ठिकाणी सामान्यपेक्षा 3.1°C ते 5.1°C ने तापमान जास्त होते. आसाम, मेघालय, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि किनारी कर्नाटकात अनेक ठिकाणी वातावरण बदलत होते.
शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना फसवी; नाना पटोलेंचा घणाघात
ओडिशात काही ठिकाणी तेलंगणा, सौराष्ट्र आणि कच्छमधील वेगवेगळ्या ठिकाणी. तापमान नेहमीपेक्षा अधिक होते. यामुळे उन्हाळा अजूनही जाणवत आहे.
दरम्यान, देशात मान्सून अजून लांबला आहे. यामुळे उन्हाळा अधिकच तीव्र झाला आहे. यामुळे सर्वांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.