भरत गोगावले वाचाळले ! भाड खायला पाहिजे पण इतका….. नको…!
मुंबई : संजय राऊत यांना कोणी अधिकार दिला ? हे स्वत:ला इतके शहाणे समजत आहेत ? भाड खायला पाहिजे पण इतका xxxxx नको, राऊत यांच्यावर कारवाई करा”. असे खळबळजनक विधान शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केले आहे. भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना शिवी दिल्याने विधानसभेत एकच गदारोळ सुरु झाला.
संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधिमंडळाला चोरमंडळ म्हटले त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राऊतांच्या विधानावर सत्ताधारी आक्रमक झाले असून हक्कभंग प्रस्तावच मांडला आहे. दरम्यान भरत गोगावले संजय राऊतांवर टीका केेली आहे.
संजय राऊत यांच्या विधानावर विधानसभेत बोलताना भरत गोगावले म्हणाले की “प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असतं. प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अती तिथे माती हे ठरलेलं आहे. हक्कभंग व्हायलाच पाहिजे. लोकांच्या भावना भडकत आहेत. बाहेर प्रक्षोभक वातावरण होऊ द्यायचं नसेल तर कारवाई झालीच पाहिजे. “