‘उरुळीकांचन’च्या नवीन ग्रामविकासलयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन! उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती….

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली) येथील नविन ग्रामसचिवालयाचे उद्घाटन रविवार ३१ रोजी सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सरपंच ऋतुजा कांचन यांनी दिली आहे.

कार्यक्रमासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार ज्ञानेश्वर कटके, राहुल कुल , माजी आमदार अशोक पवार , जग्गन्नाथ शेवाळे, रमेश थोरात ,जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद , पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप प्रमुख मान्यवर उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. उरुळीकांचन ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद निधी, वित्त आयोग व स्थानिक ग्रामपंचायत उत्पन्नातून ४ कोटी रुपये खर्चाच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त व हरितग्राम इमारत तत्वाचा सामावेश करुन साकारण्यात आली असून सरपंच, उपसरपंच कक्ष, बैठक कक्ष, कर्मचारी कक्ष, आरोग्य कक्ष आदिंचा सामावेश करुन सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे.
उरुळीकांचन ग्रामपंचायतीची शक्तोक्तर वर्षाकडे वाटचाल करीत असून या ग्रामपंचायती स्थापना १९३६ साली झाली आहे.हवेली तालुक्यात ग्रामीण क्षेत्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायतीची गणना अनेक वर्षे होती. या ग्रामपंचायतीतून अनेक ग्रुप ग्रामपंचायतीचे अस्तित्वात आल्या आहेत. तालुक्यात मोठी बाजारपेठ म्हणून या ग्रामपंचायतीकडे सोयी -सुविधांचा मोठा ताण या ग्रामपंचायतीवर आहेत. अशा स्थितीत या आधुनिक इमारतीने ग्रामपंचायतीचा कारभाराचा गाढा हाकला जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती उपसरपंच स्वप्नीशा कांचन व ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी दिली आहे.
