ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे निधन
पणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. राम गोविंद ताकवले यांचा जन्म हुरगुडे( जि. पुणे) येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांचे काही शालेय शिक्षण पुणे जिल्ह्यातील खेडेगावात झाले. त्यांच्या वडिलांची पुण्याला पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे पुणे येथे शालेय शिक्षण पूर्ण करून ते फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले.
तेथून बी.एस्सी. १९५६ साली आणि पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. १९५७ साली प्राप्त करताना त्यांनी भौतिकशास्त्र आणि सैद्धान्तिक भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी फर्गसन महाविद्यालयात आणि पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली.
Views:
[jp_post_view]