कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन; 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


पुणे:माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतचं निधन झाल आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसापासून ते आजारी होते.चाकूरकर यांच्या निधनाबद्दल माहिती कळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.

कोण आहेत शिवराज पाटील चाकूरकर?

भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म : १२ ऑक्टोबर १९३५) हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले.अनेक वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. पक्षानी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली

शिवराज पाटील यांनी अर्ध आयुष्य त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिले. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय वलय होते. आपल्या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल, याकरिता ते आग्रही असायचे. त्याप्रमाणे ते काम करत. मोठी ताकद लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसची शिवराज पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून होती.

राज्यपाल आणि अनेक मंत्रिपदे त्यांनी भूषवली आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने मोठा धक्का लोकांना बसलाय. कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. मागील काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे ते राजकारणात फार जास्त सक्रिय नव्हते. मात्र, कॉंग्रेससाठी ते नक्कीच मोठी ताकद लातूर जिल्ह्यात होते.

1963 मध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी विजया पाटील यांच्याशी विवाह केला. एक मुलगा आणि एक मुलगी शिवराज पाटील चाकूरकर यांना आहे. हेच नाही तर शिवराज पाटील यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहेत. असा मोठा परिवार शिवराज पाटील चाकूरकर यांचा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!