भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्या अलका केरकराचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

मुंबई : माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करणाऱ्या अलका केरकर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मुंबई भाजपचा एक ज्येष्ठ आणि अभ्यासू चेहरा माजी महापौर अलका केरकर वार्ड क्र. 98 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.आज( 22 मार्च ) सांताक्रूझ पश्चिम येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या दुपारी 12 वाजता सांताक्रूझमधील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर,अंत्यसंस्कार होणार आहेत.
अलका केरकर या भाजपच्या अतिशय अनुभवी नगरसेविका होत्या. त्या सलग तीनवेळा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. 2012 पासून त्या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. विशेष म्हणजे 2014 ते 2015 या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर देखील होत्या. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव होता.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर त्या महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी होत्या त्यांच्या निधनाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.