सीमा हैदरच प्रेमच वेगळं! प्रेमासाठी जमीन विकली, ७ लाख कॅश, ७ तोळे सोनं आणि ५ मोबाईल घेऊन पाकिस्तानमधून आली भारतात…

नवी दिल्ली : आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदरची सगळीकडे सध्या जोरदार चर्चा आहे. तिच्या पाकिस्तान मधील सासऱ्याने एक धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले, तिने ७ लाख कॅश, ७ तोळ सोनं, ५ मोबाईल सर्व गोष्टी पळवून आनल्या आहेत. तिच्याकडे तीन आधार कार्ड देखील आहेत.
सीमा हैदरचे तिचा प्रियकर सचिन मीणासोबतचे अनेक रोमॅटिंक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानी नवऱ्याला सोडून भारतीय प्रियकराकडे आलेल्या सीमा हैदरवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.
सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय. तिने पाकिस्तानात १२ लाख रुपयात आपली जमीन विकली. त्यानंतर दुबईहून नेपाळमार्गे ती भारतात दाखल झाली. मात्र तिचे शिक्षण फक्त ५वी झाले आहे. तिला इंग्लिश देखील बोलता येते. एक पाचवी शिकलेली महिला हे सर्व कसं करु शकते? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, त्याशिवाय ती आपल्या निकाहबद्दलही खोट बोलत आहे. सीमा हैदरपासून भारतीय सुरक्षेला धोका आहे, असं बहुतांश नेटीझन्सच म्हणणं आहे. सीमा हैदर ती साधी-भोळी असल्याचा आव आणतेय, असे म्हटले जात आहे.