पुणे जिल्ह्यात चार एसटी आगारात लालपरी धावणार सीएनजी इंधणावर ! किती गाड्या धावणार पहा ..!!


 पुणे : आता लालपरीचा डिझेलवरचा प्रवास संपणार असून ती ‘सीएनजी’वर धावणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर धावणा-या एसटी बसेसचे रुपांतर सीएनजीवर धावणा-या गाडीत केले आहे. डीझेलच्या वाढत्या किमती, प्रदूषण यामुळे डिझेलवरील धावणारी लालपरी आता सीएनजीवर धावणार असल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर, राजगुरुनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांतील एकूण 132 लालपरी बसना सीएनजीत रुपांतरीत करण्यात आले, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. त्यासाठी बारामती, शिरुन, सासवड आणि मंचर या चार आगारात स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरु आहे.

 

पुणे विभागात एकूण 14 आगार असून, दररोज हजारों प्रवासी एसटीने प्रवास करतात शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांसह पर्यटनासाठी प्रवाशांची हक्काची सेवा असलेली एसटी ख-या अथनि जीवनवाहिनी ठरत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे महामडळाने  नव्याने इलेक्ट्रिक बस घेण्यावर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!