Section 144 In Pune : मोठी बातमी! पुणे शहरात अचानक कलम १४४ लागू, नेमकं घडलं काय?

Section 144 In Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे. नुकतीच या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक आणि चालक यांची बैठक झाली आहे.
पुणे पोलीस प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आले आहे. शहरात १४४ कलम लागू केल्यानंतर आता शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली आहे. Section 144 In Pune
पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत शहरात कलम १४४ लागू असणार आहे.
दरम्यान, पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद केले जात असून पुणे पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.