पाकिस्तानला ‘या’ देशाकडून गुपचूप मदत!! महत्त्वाची माहिती समोर, भारताकडून होणार मोठा निर्णय..


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चीन व्यतिरिक्त एका देशाने पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे मदत केल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीने या संघर्षात हस्तक्षेप केल्याचे दिसत आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध करत तुर्कियेने पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुर्कियेचे एक विमान पाकिस्तानच्या भूमीवर उतरल्याची घटना घडली आहे. या घटनेने भारत आणि तुर्किये यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामुळे वातावरण तापले आहे. यामधून पाकिस्तानला मदत केल्याचे सांगितले जात आहे. तुर्कियेने म्हटले आहे की, सदर विमान केवळ काही मिनिटांसाठीच पाकिस्तानात थांबले होते आणि ते तात्काळ परत बोलावण्यात येत आहे.

या विमानातून पाकिस्तानला काही प्रमाणात रसद, विशेषतः ड्रोन्स किंवा इतर लष्करी सामग्री पुरवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. यामुळे आता तुर्कीने भारतासोबत देखील शत्रुत्व पत्कारले आहे. तुर्कियेच्या या कृतीमुळे भारत आणि तुर्किये यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलेला असताना, तुर्कियेने पाकिस्तानला केलेल्या या मदतीबद्दल अद्याप कोणत्याही अधिकृत माहिती नसली तरी याबाबत सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील आधीच स्फोटक असलेल्या परिस्थितीत आणखी भर पडली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष दिले जात आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता युद्धपातळीवर पोहोचला असून, गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही राष्ट्रांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलणार की तशीच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अजून हल्ले सुरूच आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!