माळेगाव निवडणुकीचा दुसरा कौल देखील नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने! अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार रतनकुमार भोसले आघाडीवर…


बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीतील पहिल्या कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब प्रवर्गातून मोठ्या फरकाने विजय झाल्यानंतर आता नीलकंठेश्वर पॅनलचे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार रतनकुमार भोसले हे आघाडीवर आहेत.

यामुळे अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला हा आणखी एक सुखद धक्का आहे. या मतदारसंघातून सहकार बचाव पॅनलचे म्हणजे चंद्रावर आणि रंजनकुमार तावरे यांचे बापूराव गायकवाड आहेत ते पिछाडीवर आहेत. प्राथमिक करानुसार रतनकुमार भोसले हे विजयाच्या मार्गावर असल्याचे सांगितले जाते.

अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग आणि महिला यामध्ये हा ट्रेड कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निलकंठेश्वर पॅनलचे दोन उमेदवार हे आघाडीवर असून एक विजयी झाले आहेत. एकूणच परिस्थिती लक्षात घेता ट्रेन्ड लक्षात घेता इतर गटांमध्ये हाच ट्रेंड कायम राहील असंही बोललं जात आहे.

परंतु सध्याची मतमोजणी सुरू आहे ती अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची सुरू आहे आणि त्यानुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले विजयाच्या मार्गावर आहेत. सर्वांचे लक्ष लागलेले सर्वसाधारण मतदार संघात काय होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!