लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले! सर्वाधिक जागा ठाकरे गटाला, जाणून घ्या….


मुंबई : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. याबाबत त्यांनी जागा वाटप देखील केले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. राज्यात लोकसभेसाठी ४८ जागा आहेत.

मविआने या जागा एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९, काँग्रेस ८ जागा असा हा फॉर्म्युला ठरला आहे. मुंबईत ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीला उद्धव ठाकरे, ठाकरे संजय राऊत, जयंत पाटील, अजित पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कॉंग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडल तर ममता बॅनर्जीचा पाठिंबा घेतला तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडले होतं का?, काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!