पुण्यात कोयता गॅगचा धुमाकूळ ; धारदार कोयत्याने पान टपरी चालकावर हल्ला, पोलीस कधी आवर घालणार?


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये कोयता गॅगची दहशत वारंवार सुरूच आहे. अशातच आता पुण्याच्या विमान नगर परिसरातील एका पान टपरी चालकावर कोयता गॅगने हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमान नगर परिसरातील एका पान टपरीवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दुकानावर येऊन वस्तू मागितल्या. सिगारेटचे पैसे मागितल्यानंतर टोळीतील एकाने कोयता बाहेर काढून दुकान फोडायला सुरुवात केली. तसेच दहशत निर्माण करून त्यांनी सिगारेटचे पाकीट ही चोरले. हा हल्ला फुकट वस्तू मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता.
या टोळक्यात काही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस खात्याकडे केली आहे. आता तर पुण्यातील गुन्हेगारी वृत्तीला आळा बसणार का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका बारमध्ये कोयता गँगने चांगलीच लूटमार केल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता विमाननगरमध्ये कोयता गँगने एका पान टपरी व्यवसायिकावर हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!