वादग्रस्त माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून आणखी एक गोंधळ…!
नवी दिल्ली : जेएनयूमध्ये मंगळवारी बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून झालेल्या गदारोळानंतर आता बुधवारी जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे स्क्रीनिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याआधीही विद्यापीठात गदारोळ झाला होता.
बीबीसीच्या माहितीपटाचे स्क्रिनिंग आज जामियामध्ये संध्याकाळी 6 नंतर होणार होते. मात्र, आज दिवसभरातच पोलिसांनी याप्रकरणी जामियाच्या आठ क्रमांकाच्या गेटमधून चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात गोंधळ घातला.
त्यामुळे सायंकाळी स्क्रीनिंगवर संशयाचे ढग दाटून येत आहेत. स्क्रिनिंग होणार की नाही हे सायंकाळपर्यंतच फायनल होईल, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
माहितीपटाच्या स्क्रीनिंगच्या मुद्द्यावर, जामिया प्रशासनाने म्हटले आहे की परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांची बैठक किंवा कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन होणार नाही. कॅम्पसमधील शांतता भंग होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रत्येक पाऊल उचलत आहे.